शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
तृतीयपंथी घटकांना सन्मान मिळावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या फोर फॉक्स प्रॉडक्शन संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून समाजातील सर्व घटकांनी या घटकांना सन्मानाने वागावे, अशी प्रतिक्रिया महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
तृतीय पंथीयांना कोणताही रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव भीक मागून जगावे लागते, त्यांना समाजात सन्मान मिळण्यासाठी तसेच स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्यालाही तृतीयपंथीयांना कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. त्या करीता पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील फोर फॉक्स प्रोडक्शन च्या वतीने “अर्धनारी नरेश्वर” आणि मिस अँड मिसेस व्हिजन महाराष्ट्र प्रेझेंट या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती फोर फॉक्स प्रॉडक्शनच्या वतीने देण्यात आली आहे.
पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, फोर फॉक्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक संचालक माहीर करंजकर, के.सी. चौधरी, महेश चरवड, लेखिका व कवयित्री सोनल गोडबोले, सहारा प्रोडक्शन हाऊस चे संस्थापक संचालक डॉ.राजेंद्र भवाळकर , अखिल भारतीय जाणीव संघटनेचे आनंद पायाल, पूनम मिश्रा, गौरव मंडल, रवी कदम, पुणेरी प्राईड प्रोडक्शन अध्यक्षा प्रेरणा वाघेला (तृतीयपंथी), बिईंग वुमनच्या संचालिका रोहिनी वाजपेयी, शुभांगी नांदुरकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके उपस्थित होते.
फॅशन शोमध्ये महाराष्ट्रातून विजेत्या 10 मॉडेल सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडून कोणतेही प्रवेशशुल्क घेण्यात येणार नाही. तृतीयपंथीयांना रोजगाराची संधी आणि समाजात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने तसेच ते स्वबळावर उभे राहावेत म्हणून फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या घटकाला समाजात स्थान निर्माण व्हावे, म्हणून त्यांना नोकरी, स्किल डेव्हलपमेंट, ट्रेनिंग तसेच स्पोकन इंग्लिश तसेच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे समाजामध्ये तृतीयपंथी यांमध्ये जनजागृती निर्माण होईल आणि समाजामध्ये तृतीयपंथीयांना एक प्रकारचा न्याय मिळेल.
फोर फॉक्स प्रोडक्शन च्या वतीने आयोजित अर्धनारी नरेश्वर आणि मिस अँड मिसेस व्हिजन महाराष्ट्र संस्थेच्यावतीने रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन फोर फॉक्स प्रोडक्शन चे संस्थापकमाहीर करंजकर संचालक, के.सी. चौधरी, शर्वरी गावंडे, महेश चरवड यांनी केले आहे. फॅशन शो डायरेक्शन योगिता गोसावी, पूनम मिश्रा, गौरव मंडल, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, चिनू कावत्रा यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी सहारा प्रॉडक्शनचे डॉ.राजेंद्र भाळकर, लेखिका सोनल गोडबोले, मीडिया सोलुशनच्या रोहिणी वांजपे, रवी कदम, अखिल भारतीय जाणीव संघटनेचे अध्यक्ष फुलचंद पायल, पुणेरी प्राइड च्या अध्यक्षा मयुरी बनसोडे, प्रेरणा वाघेला यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी “द सुपर स्टोर” ची निर्मिती
लॉकडाऊन मुळे असंघटित क्षेत्रातील लोकांच्या रोजीरोटीवर आलेले संकट आपण सर्वजण जाणत आहोतच. या पार्श्वभूमीवर फोर फॉक्स प्रॉडक्शन च्या वतीने त्यांना मोलाचे सहकार्य होणार आहे. तृतीयपंथी साठी द सुपर स्टोअरच्या माध्यमातून त्यांना नोकरी किंवा व्यवसाय उपलब्ध करून दिला जाणार आहे. या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी स्वयं:रोजगाराची संकल्पना प्रत्यक्षात आखली जाणार आहे. केवळ समाजापासून तुटलेल्या घटकांना प्रवाहात आणण्यासह त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून ही सुरुवात आहे. इतरांनाही त्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
समाजात समलैंगिक तृतीयपंथीयांना अनेकदा हीन वागणूक दिली जाते. तृतीयपंथीयांना सिग्नलवर व लोकलमध्ये भीक मागावी लागते. त्यापेक्षा त्यांना चांगले मानाचे स्थान मिळावे, यासाठी हा उपक्रम चालवला आहे. आपण संस्कृतीच्या नावाखाली अनेकदा वैज्ञानिक वास्तवापासूनही दूर जातो, याचा परिणाम म्हणून अनेकदा समाजातील एखादा घटक वंचित राहण्याचा धोका असतो. तृतीयपंथीयांच्या बाबतीत असेच झाले आहे. तृतीयपंथीयांना आपण वाळीत टाकल्यासारखे समाजापासून दूर ठेवले होते. त्यांना फोर फॉक्स प्रॉडक्शन च्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – 8291525522