शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
नाना काटे सोशल फाऊंडेशनचा एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत निसर्गाच्या संकटाला धैर्याने तोंड देणाऱ्या कोकणामधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तू द्वारे नाना काटे सोशल फाउंडेशन वतीने मदत करण्यात आली.
Advertisement
या वस्तु घेवुन ट्रक चिपळूणच्या दिशेने रवाना करण्यात आला. ही मदत चिपळूणचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे , माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राज कोठारी, अविनाश गायकवाड, प्रशांत देवकाते, कुंदन कातुरे, शाहरूख शेख आदि उपस्थित होते.
Advertisement