शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील माधुरी भानुदास गरुड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत 561 वी रँक प्राप्त केली. यंदा यूपीएससी उत्तीर्ण होणारी पिंपरी-चिंचवडमधली ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल पिंपरी चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी तिच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन तिला शुभेच्छा दिल्या.
Advertisement
यावेळी नाना काटे म्हणाले कि, माधुरी गरुड हिची जिद्द, चिकाटी आणि दृढ निश्चय हे पुढे स्पर्धात्मक परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
Advertisement