शबनम न्युज | भोसरी
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
उन्मुक्त युवा संगठन यांच्या वतीने आज ३ ऑक्टोबर २०२१ रोजी आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. लांडेवाडी येथील टेल्को रोड परिसरात ही मोहीम राबवण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा, दारूच्या बाटल्या आणि धोकादायक कचरा आढळून आला.
Advertisement
सदर अभियानामध्ये नेहरू युवा केंद्र संगठनच्या हवेली तालुका स्वयंसेवक सुचिता आदाटे, समजिक कार्यकर्ते हृषिकेश तपशाळकर ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका क प्रभाग आरोग्य विभाग मुकादम प्रकाश सौदा सफाई कर्मचारी विक्रम गायकवाड, राजकुमार वाल्मिकी, चंद्रप्रकाश दासरे,सुरेश हुलावळे, आणि उन्मुक्त युवा संगठन चे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. तसेच येथून पुढे देखील स्वच्छतेविषयी जनजागृती करणार असल्याचे सांगितले.
Advertisement