शबनम न्युज | बेलापुर
मुंबई | प्रतिनिधी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापुरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटत असल्याचे म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.
Live | महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ | नवी मुंबई @mandamhatre https://t.co/fkMGgkAI3U
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2021
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “गणेश नाईक असतील, तुम्ही (भाजपा आमदार मंदा म्हात्रे) असाल, पाटील साहेब असतील यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचं कार्याचं कौतुक केलं आहे. कुटुंबाप्रमाणे आमल्या मतदारसंघाची काळजी करत भूमिपुत्र, आगरी कोळी, महिला विकासांचे उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. माथाडी कामागारांच्या लसीकरणाचा विषय असेल त्या नेहमीच पुढाकार घेतात. एक्सप्रेस हाय वेवर महिलांसाठी फिरते शौचालयाची सोय करणं हे फक्त आमच्या ताईच करू शकतात, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांचं कौतुक केलं आहे.