शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनातील रिक्त जागांची माहिती सरकारने घेतली असून आतापर्यंत आठ हजाराहून अधिक रिक्त जागांचे मागणीपत्र प्राप्त झाले असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच आणखी रिक्त जागांची माहिती घेण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची नवी मुदत देण्यात आली आहे. यामध्ये आकृतीबंध तपासून आणखीही जागा वाढण्याची शक्यता असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Advertisement
रिक्त जागांची माहिती एमपीएससीकडे तात्काळ सोपवून उमेदवारांना दिलासा देण्याचे काम करु. परिक्षा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितपवार हे स्वतः लक्ष घालत असल्याचेही यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Advertisement