शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
नवरात्र उत्सवानिमित्त शिवसेनेचे युवा नेते आकाश चतुर्वेदी यांच्यावतीने एम्पायर इस्टेट सोसायटी, विस्डम पार्क सोसायटी, शांग्रिला सोसायटी मधील रहिवाशांकरिता फिटनेस व गरबा क्लास चे आयोजन करण्यात आले.नवरात्र उत्सवात गरबा नृत्याला विशेष महत्त्व असते या नृत्याचे प्रशिक्षण शिबिर यानिमित्ताने संपन्न झाले, या उपक्रमास एम्पायर इस्टेट सोसायटीतील तसेच इतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सहभाग घेऊन हे उपक्रम यशस्वी केले.
सदरचे उपक्रम हे 15 दिवस चालले. या उपक्रमात एकूण 70 महिलांनी सहभाग घेतला व सदरचा उपक्रम यशस्वी केला. या सर्व सहभागी महिलांना युवा नेते आकाश चतुर्वेदी यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रम वेळी एम्पायर इस्टेट मित्र मंडळ फेडरेशन वतीने आयोजित आरतीला पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांचे सुपुत्र युवानेते सिद्धार्थ अण्णा बनसोडे यांनी हजेरी लावली. यावेळी सोसायटीमधील सर्वच पदाधिकारी, नागरिक, रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते, युवा नेते आकाश चतुर्वेदी यांनी यावेळी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.