शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, किवळे परिसरातील युवा नेते राजेंद्र तरस यांच्या राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन व रणझुंजार महिला मंच वतीने जागतिक दृष्टी दिनानिमित्त भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये सर्व रुग्णांची नेत्र तपासणी तसेच अल्पदरात चष्मा वाटप व शिबिरात मोतीबिंदूचे निदान झालेल्या शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्यांची अल्पदरात शस्त्रक्रिया पुणे येथील अद्यावत अशा एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांना शिबिरानंतर पुणे येथे घेऊन जाणे व आणण्याची मोफत व्यवस्थाही करण्यात आली. 30 ऑक्टोबर पर्यंत हे शिबिर सुरू असणार असून किवळे, विकास नगर, मामुर्डी, साई नगर, आदर्श नगर, बापदेव नगर, माळवाडी नगर, श्री नगर ,दत्तनगर, सर्व भागांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस व श्री राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी दिली.
पंधरा दिवस हा सप्ताह आयोजित केला असून प्रभाग क्रमांक 16 मधील प्रत्येक कॉलनी व नगर मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचे राजेंद्र तरस यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 47 नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, गेल्या एक वर्षभरापासून राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन वतीने विकास नगर भागात मोफत नेत्र तपासणी व चिकित्सा शिबिर करत असून आत्तापर्यंत सहाशे पन्नास पेक्षा जास्त नागरिकांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन मार्फत मोफत करण्यात आलेली आहे . या शिबिराचे आयोजन राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन रणझुंजार महिला मंच यांनी आयोजित केला आहे.
यावेळी परिसरातील नागरिकांनी व लाभधारकांनी युवा नेते राजेंद्र तरस यांचे आभार व्यक्त केले. येत्या १५ दिवसात अनेक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन युवा नेते राजेंद्र तरस यांनी केलं.