शबनम न्यूज , प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यपद्धत अख्या महाराष्ट्राला अवगत आहे, सकाळी सहा वाजता ते आपल्या कामाची सुरुवात करतात, राज्यातील विविध विकास कामांना भेटी देतात, कार्याचा आढावा घेतात, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात ,चर्चा करतात ,व कामे तडीस त्वरित कसे जाईल यासाठी त्यांच्या कामाचे नियोजन असते, तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या बैठका ,सभा ,पदाधिकाऱ्यांची चर्चा ,असा त्यांचा दिनक्रम असतो, त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच अजित पवार हे अख्ख्या महाराष्ट्रात लोकप्रिय असे नेते झाले आहेत.
अख्या महाराष्ट्रात त्यांना त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच ओळखले जाते ,असे असताना पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनियुक्त म्हणजेच नवीनच पदभार स्वीकारलेले शहराध्यक्ष तुषार कामठे यांना जणू आपल्या पदाची ताकद मिळाली आणि त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली.
तुषार कामठे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील एका कार्यक्रमात अजित पवार हे सकाळी सहा वाजता केवळ ठेकेदारांच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या विकासासाठीच काम करतात अशी टीका केली. त्यांनी सांगितले की अजित पवार नेहमी सांगतात मी सहा वाजता उठून कामाला लागतो तर त्यांनी कोणाचा विकास केला, ? फक्त ठेकेदार व त्यांच्या जवळच्या माणसांच्या कामासाठीच अजित पवार हे सकाळी सहा वाजता उठून कामाला लागतात तसेच सकाळी सहा वाजता ठेकेदारांना सोबत घेऊन ते विकास कामे करत असतात
अशी टीका केली
या टीकेला प्रत्युत्तर देत अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील कालच्या एका सभेत तुषार कामठे यांच्या या टीकेचा खरपूस समाचार घेतला, अजित पवार यांनी सांगितले की सर्वांनाच माहित आहे की मी सकाळी सहा वाजता उठून कामाची सुरुवात करतो, अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बरोबर घेतो, तरी एक शहाणा दीड शहाणा तुमच्या भागातला ,तो म्हणतो की अजित पवार ठेकेदारांना सोबत घेऊन फिरतो, तुझ्या बापाने बघितलं होतं का कधी सकाळी सहा वाजता ठेकेदार माझ्यासोबत ,काहीही बडबडायचं ,स्वतः काही करायचं नाही, उगाच उचललेली जिभ लावली टाळ्याला , त्याला किंमत पण द्यायला नाही पाहिजे ,असले कितीतरी आले आणि कितीतरी गेले ,अशा शब्दात अजित पवार यांनी तुषार कामठे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
तुषार कामठे हे मूळचे भाजपचे नगरसेवक होते, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला स्वतःच्या पक्षाचे दोन्ही आमदार यांच्या विरोधात जाऊन त्यांनी काम केले. परंतु अजित पवार यांच्यावर टीका करताना ते हे विसरले की काही दिवसांपूर्वी अजित पवार हे किती कार्यक्षम नेते आहेत हे दाखविणारे फ्लेक्स त्यांनीच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर भर झळकविले होते.