शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे शहरात आज सामाजिक कार्यकर्ते विशंभर चौधरी कायदे तज्ज्ञ असीम सरोदे आणि जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे भाषण होते ,मात्र या सभेला उधळून लावू असा इशारा भाजपने दिला होता ,अशात कार्यक्रमासाठी जात असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, यामध्ये गाडीवर शाई फेक करत काचा फोडण्यात आल्या, यामुळे पुणे शहरात एकच गोंधळ उडाला ,पोलीस प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणली असून निखिल वागळे हे सभेच्या ठिकाणी पोहोचले आहेत.
भाजप वतीने सदर सभा उधळून लावण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता, निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी उपपंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या बद्दल विधान केले होते त्या विधानाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते हे निखिल वागळे यांच्या विरोधात आक्रमक झाले , यातूनच त्यांच्यावर पुण्यात दगडफेक करून त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली व शाई फेक करण्यात आली अशी बातमी समोर येत आहे.