श्रावणी इव्हेंटने केले मनोरंजन नगरीचे आयोजन
पिंपरी चिंचवड
मोशी : (प्रतिनिधी ) साईनाथ सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून श्रावणी इव्हेंटच्या वतीने मोशी येथील चिखली रेसिडेन्सी सोसायटी जवळील मैदानावर भव्य मनोरंजन नगरी आयोजित करण्यात आली आहे.या मनोरंजन नगरीचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे मा नगरसेवक वसंत बोराटे यांच्या हस्ते संपन्न झाले.मनोरंजन नगरीतील विविध खेळांच्या राइड्सचा आनंद घेण्यासाठी मोशीकर गर्दी करत आहेत,अशी माहिती श्रावणी इव्हेन्टचे व्यवस्थापक कानिफनाथ भुजबळ यांनी दिली.मोशी येथील चिखली रेसिडेन्सी सोसायटी जवळील मैदानावर उभारण्यात आलेल्या मनोरंजन नगरीत विविध खेळांचा आनंद घेण्यासाठी बालचमू आपल्या पालकासह गर्दी करीत आहेत यामधील फनफेअरमध्ये असणाऱ्या विविध खेळांचा आनंद मुले लुटत आहेत.
श्रावणी इव्हेंटचे कानिफनाथ भुजबळ यांनी सांगितले की,सध्या मुलांच्या शाळांना सुट्टी आहे मागील दोन वर्षे कोरोना मुळे मुलांना आनंद घेता आला नव्हता आता सर्व निर्बंध शिथिल झाल्याने या मनोरंजन नगरीचे आयोजन करण्यात आले आहे.ही मनोरंजन नगरी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत१७ मे पर्यंत चालू असणार आहे.
ही मनोरंजनगरी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत खुली राहणार आहे. यामध्ये खेळांच्या विविध राइड्स उपलब्ध करून दिल्याने मोशीकर या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत आहेत, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. विविध राइड्समध्ये लहान मुलांसाठी मूनवॉकर, कपबशी, झुला, कार, जीप, प्लेन, हेलिकॉप्टर, वॉटर पार्क, सी-सॉ, मोठ्यांसाठी कोलंबस, मेरी गो राऊंड, ड्रॅगन ट्रेन, ब्रेक डान्स, सोलंबो सर्वांचे आकर्षण असलेले उंचच उंच पाळणे, क्रॉस व्हील, तसेच विविध खाद्यपदार्थ येथे आहेत. मनोरंजननगरीस भेट देऊन मोशीकरांनी अनेकविध राईडस्चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे मुले घरी राहून मुलांमध्ये एकलकोंडी भावना निर्माण झाली होती.आता सर्व काही सुरळीत झाल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना आनंद लुटण्यासाठी मनोरंजन नगरीचे आयोजन केले आहे. लहान मुलांसाठी असणाऱ्या खेळांच्या विविध राइड्स येथे आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे.मोशी परिसरातील पालक, बालकांनी मनोरंजन नगरीत सहभागी व्हावे. जत्रेचा आनंद घ्यावा. वसंत बोराटे मा नगरसेवक