शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
जश्ने ईद मिलादुन्नबी ( सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) पैगंबर जयंतीनिमित्त २०२१ चे आज रोजी पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय मध्ये वजन मशीन व डिजिटल घड्याळ रुग्णालयाचे साधी अधिष्ठाता मा. डॉक्टर राजेंद्र वाबळे यांना संघटनाचे प्रदेश कार्याध्यक्ष शहाबुद्दीन शेख, मुफ्ती अबीद रजा, मौलाना अफिफ रजा, कोर कमिटी सदस्य व्ही.एम कबीर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ इमरान बेग, असद पटेल पिंपरी विधानसभा अध्यक्ष फिरोज शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कासीम बागवान, उपाध्यक्ष मुस्ताक सय्यद, सरचिटणीस आसिफ पठाण यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी रुग्णालय प्रशासन चे डॉक्टर मारुती गायकवाड (भूलतज्ञ ), डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर अनिकेत राठी, डॉक्टर कौस्तुभ सर, सिस्टर इंर्चज कुलकर्णी मॅडम, सिस्टर खैरे मॅडम व त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ सदस्य अनिल राऊत, युनूस पगडीवाले, विजय आठवाल, राजेंद्र वाघमारे,मॉन्टी वाघमारे ज्ञानेश्वर गायकवाड, तुकाराम लांडगे उपस्थित होते.
मुफ्ती मोहम्मद अबीद रजा व मौलाना अफिफ रजा यांनी प्रेषित मोहम्मद ( सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी अख्ख्या जगाला जे मानवता चे संदेश दिलेला आहे, ते आपल्या मनोगत मध्ये त्यांनी व्यक्त केलं व समाजामध्ये आपण एक मेकांसोबत कसे राहावे, कसे वागावे, कसे जगावे जे आदर्श जी प्रेरणा शिकवण प्रेषित मुहम्मद यांनी सर्वांना दिलेली आहे, तेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं प्रयत्न केले व मोहम्मद यांनी दिलेली शिकवण एका फोटो फ्रेम मध्ये सर्व कमिटीचे वतीने भेट म्हणून डॉक्टर राजेंद्र वाबळे यांना देण्यात आले.