शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
बिबवेवाडी येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तुरुंगात पाच ते सहा महिने काढल्यानंतर जामिनावर सुटून आलेल्या गुंडाने कोंढव्यातील पान टपरी चालकाकडे थकलेले खंडणीची हप्ते मागितले. ते न दिल्याने त्याच्यावर तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार कोंढव्यात घडला आहे.
याप्रकरणी अनिल रमेश चव्हाण 9वय 20 रा. अप्पर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मंगेश अनिल माने (वय 23 रा. सुख सागर नगर) अखिलेश कलशेट्टी (रा. गोकुळ नगर) सुरज बोकेफोडे (रा. माऊली नगर) सागर जाधव (रा. सुखसागर नगर) आणि त्यांचे दोन ते तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची कोंढवा बुद्रुक येथील साळवे गार्डन येथे पानटपरी आहे. मंगेश माने हा सराईत गुन्हेगार असून तो बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात पाच ते सहा महिने होता. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता.