शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौकापर्यंत लिनियर गार्डन मध्ये सुरक्षेबाबत उपाय योजना करा, असे मागणीचे निवेदन मा.विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते पी के चौक व गोविंद यशदा चौक ते स्वराज गार्डन चौकापर्यंत लिनियर गार्डन मध्ये कोकणे चौक येथे इन व पी के चौक येथे आऊट तसेच गोविंद यशोदा चौक येथे इन ते स्वराज गार्डन चौक येथे आऊट गेट उभारण्यात यावे जेणे करून या उद्यानाची निघा राखता येथील सध्य स्थितीत या उद्यानमध्ये कोणतीही व्यक्ती कोठूनही प्रवेश करू शकते तसेच बाहेर जावू शकते, यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या उद्यानांची नासधूस होत आहे तसेच उद्यानाच्या पाहणीवेळी आमच्या निदर्शनास आली आहे की लहान मुलांच्या खेळणी असलेले उपकरणांची देखील मोडतोड झालेली आहे. येथील ओपन जिम मध्ये सुद्धा काही उपकरणे बंद स्थितीत व नादुरुस्त आहेत तसेच रात्री या उद्यानामध्ये मनपा तर्फे नेमलेले सुरक्षा रक्षक दिसत नाहीत त्यामुळे टवाळखोर, जोडपी, काही मध्यपीचा येथे वावर असतो त्यांच्या या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांना व सोसायटी मधील रहिवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बाबीबाचा विचार करता उद्यानाच्या सुरक्षेबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट नुसार या उद्यानाचा रस्त्यालगत फुटपाथ, सायकल, ट्रॅक चे काम चालू आहे त्यामुळे हे उद्यान रोड च्या बाजूने पूर्णपणे ओपेन आहे त्यामुळे पाळीव जनावरे या उद्यानात प्रवेश करतात व झाडाची नासधूस करतात याबाबत देखील उपाययोजना करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने काटेरी तारेचे कुंपण घालण्यात यावे, तसेच या उद्यानामध्ये रात्रीच्या वेळी लाईट ची व्यवस्था करण्यात यावी व कोकणे चौक येथे माळी कामगारांसाठी साहित्य ठेवण्यासाठी एक खोली बांधण्यात यावी,असे हि नगरसेवक नाना काटे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.