शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
Advertisement
पिंपरी-चिंचवड शहराचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या संकल्पनेतून प्रभागात महापालिकेच्यावतीने एमपीएससी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाचनालय उभारण्यात आलेले आहे.
या वाचनालयाची नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पाहणी केली. व सध्या या वाचण्याचे काम पूर्ण झाले असून यात बसण्यासाठी लागणाऱ्या टेबल, कॉम्प्युटर आणि आवश्यक पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करण्याच्या सूचना यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Advertisement