शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
कोरोना काळानंतर व्यवसाय व उद्योगधंदे पूर्वपदावर येत असताना महापालिकेकडून पथारीधारक,भाजीविक्रेते व हातगाडी फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून सर्व फेरीवाले,भाजीविक्रेते व पथारीधारक यांचा नव्याने सर्वेक्षण करून त्यांना हाॅकर्स झोनची आखणी करून द्यावी, त्याबाबतचे धोरण तयार असूनदेखील अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसून भाजीविक्रेते,पथारीधारक व हातगाडीवर व्यापारीवर्गावर कारवाई करण्यापूर्वी त्यांची नोंदणी करून पुनर्वसन करण्यात यावे, व त्यानंतर नियमबाह्य व्यवसायिकांवर कारवाई करावी, असे निवेदन पिंपरी युवासेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग अधिकारी इंगळे यांना देण्यात आले आहे.
यावेळी पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके, सामाजिक कार्यकर्त्यां शीलामामी जाधव, सुनील झिटे, अनिकेत घुले, जीवन चलवारे, संकेत जावळकर, लश्मी भंडारे, मोजेस अंतोनी, रंजना कांबळे उपस्थित होते.