शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खड्डे बुजवा, अशी मागणी शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हणाले आहे कि, निगडी ते दापोडी या प्रमुख महामार्गासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे दिसत आहेसर्वत्र मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे आहे. नुकताच पावसाळा संपत आलेला आहे. या पाऊसकाळात शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्यांच्या प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालक नागरिकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
शिवाय या खड्यामुळे जागोजागी छोटेमोठे अपघात ही होताना दिसत आहे. आता थोड्या दिवसात दिवाळी सण येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची खरेदी किंवा इतर कारणासाठी मोठी वर्दळ सुरु होणार आहे. सर्व शहरातील सर्व रस्त्यांवर पडलेले खड़े तातडीने बुजवून रस्ते पूर्ववत करणे संदर्भात आपणांभापंथ संबंधिताना आदेश देण्यात यावेत, असेही सदर निवेदनात सचिन चिखले यांनी नमूद केले आहे. तसेच आयुक्त कक्षाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
या वेळी शहर अध्यक्ष सचिन चिखले, अश्विनी बांगर,,राजु सावळे, विशाल मानकरी, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी सिमा बेलापूरकर, श्रद्धा देशमुख, अनिता पांचाळ, नितीन चव्हाण, अलेक्स अप्पा मोझेस, सुरेश सकट, नितील सूर्यवंशी”, नारायण पठारे, कृष्णा महाजन, शिशिर महाबलेश्वरक, गणेश अवघडे, आकाश पांचा, विशाल साळुंके, दुर्गे कैलास, वैशाली बोत्रे ,विद्या कुलकर्णी, पंकज चपटे आदी उपस्थित होते.