शबनम न्यूज | पुणे
सिंगापूर येथील व्हिनस वर्ल्ड संस्थेतर्फे, समन्वयक शर्मिला पांडे(पॅरिस) यांच्या शुभहस्ते विश्वविक्रमवीर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना, लायन ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड.ब्रेकर्स बी हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार ऑनलाईन प्रदान करण्यात आला, अशी माहिती समर्पण संस्थेच्या सचिव सौ.प्रतिमा अरुण काळे यांनी
दिली आहे.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या नावे डायमंड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस, भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस आदि मार्फत सुमारे 250 विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. शीळवादन,
जुन्या90 गायक.गायिकांच्या सलग 90गाण्यांचे सादरीकरण, सलग १०० प्रेमगीतांचे सादरीकरण, विदेश दौऱ्यात एका सप्ताहात सर्वाधिक पर्यटकांचे हातावरुन तात्काळ विनामूल्य भविष्यकथन, सबकुछ.मधुसूदन ह्या एकपात्री कार्यक्रमाचे भारतासह 17 देशात 65,000 हून अधिक प्रयोग, 111 अनुबोधपट, सर्वाधिक काव्यसंग्रह, ग्रामीण काव्यात हायकू..चारोळी.. गझल प्रकार.., अंकज्योतिष तसेच हस्ताक्षर मनोविश्लेषण विषयक सर्वाधिक प्रकाशित पुस्तके, दिव्यांगांसाठी सर्वाधिक विनामूल्य एकपात्री.कार्यक्रम (45,000 हून अधिक प्रयोग), सर्वाधिक काळ..सातत्याने विनामूल्य ‘डहाळी’ अंक प्रिंट मिडियाद्वारे तसेच हस्तलिखित स्वरुपात, सर्वाधिक सलग आलाय. याॅडलिंग.हमिंगचे
सादरीकरण, कमीत कमी वेळेत सर्वाधिक सह्यांचे तात्काळ विनामूल्य स्वभाव कथन( जो कुणी भेटेल त्या प्रत्येकाचे), कमीत कमी वेळेत सर्वाधिक लघुपट..त्यातही कथा.पटकथा.गीतलेखन. दिग्दर्शन.. प्रमुख भूमिका..नेपथ्य..सर्व जबाबदा-या एकट्याने सांभाळून निर्मिती, सर्वाधिक अभिनेत्रींसह एकमेव प्रमुख भूमिका..दिग्दर्शन.. शीळवादन..गायन..संगीत..नेपथ्य.. यासह चित्रपटाची निर्मिती, दृष्टीहिन विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावरून स्वभावदर्शनाचा जाहिर विनामूल्य कार्यक्रम, दृष्टीहिन रसिकांसाठी बघू तुझा हात हा हस्तसामुद्रिक शास्त्रावर आधारीत एकपात्री.कार्यक्रम, बे दुणे चकली ह्या एकपात्री.कार्यक्रमात सर्वाधिक पात्रांचे(108 पात्रे) सादरीकरण, सही..कुंडली..गाणे विषयक एकपात्री.कार्यक्रम..गाणारे भाग्यांक, जिथे रसिक तिथे कार्यक्रम…सर्वाधिक प्रयोग देशविदेशातून सातत्याने…असे विविध विश्वविक्रम डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले आहेत.हे सर्व विश्वविक्रम 2003 मधे बायपास सर्जरीनंतर केले आहेत.
डाॅ. घाणेकर यांनी हाॅस्पिटल मधे स्ट्रेचरवर असताना,ऑक्सिजनवर असतानाही भेटणा-या रसिकांसाठी
शीळवादन..गाण्यांची झलक..मिमिक्री करुन मनोरंजन केले आहे.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जागतिक पातळीवरील टाॅप 100 मधील विश्वविक्रमवीर म्हणून 2017मधे दिल्ली येथे वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर्स युनियन तर्फे जाहिर.रित्या सन्मानित केले.
2016 मधे 18.राष्ट्रीय.आंतरराष्ट्रीय संस्थांनी रेग्युलस ता-यास सर डाॅ.मधुसूदन घाणेकर रेग्युलस तारा असे नाव जाहिररित्या दिले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या या यशाबद्दल प्रशांत राजे,नागेश हुलावळे,कृष्णकांत चेके, विश्वास धोंगडे, श्रीनिवास रायरीकर ,मंगला मेहेर आदि कलावंतांसह समर्पण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रवीण शेटे..सचिव प्रतिमा काळे, काव्यशिल्प.च्या अध्यक्षा ऋचा कर्वे, लाफ इंटरनॅशनल.च्या कार्याध्यक्ष ॲड.ज्योति लिमये , महिला.ज्योतिर्विद च्या माजी अध्यक्ष ॲड.सुनिता पागे, साहित्य गौरव.च्या कार्याध्यक्षा मंदाताई नाईक, अक्षरआनंद इंटरनॅशनल चे संस्थापक.अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी,
सुप्रसिध्द गायिका.अभिनेत्रीं गीतांजली जेधे,क्रीडापटू डाॅ.नीलम खानापूरकर, सॅम इंटरनॅशनलच्या डाॅ.समता कुलकर्णी,सनराईज इंटरनॅशनलच्या प्रेसिडेंट सुप्रिया मुखर्जी,इन्टरनॅशनल.च्या संस्थापक.अध्यक्षा ॲड.शुभांगी बराटे,मधुरंगचे प्रसिध्दीप्रमुख यशवंत गरड आदिंनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे .