शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेत ESIC सुविधा नसलेल्या कंत्राटी, हंगामी, स्थायी व मानधनावरील कामगारांना मनपा रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत.अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे सरचिटणीस तथा सोशल मीडिया प्रमुख हनुमंत लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
ESIC नसलेल्या कंत्राटी हंगामी अस्थायी मानधनावरील कामगारांना मनपा रुग्णालयात मोफत उपचार मिळत नाही सदर कामगार ESIC च्या वैद्यकीय उपचारापासून वंचित आहेत या सर्व बाबींना महानगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याने सदर कामगारांना ESIC सवलत मिळेपर्यंत महानगरपालिकेच्या रुग्णालयात या कामगारांना मोफत उपचार मिळावे असे निवेदन हनुमंत लांडगे यांनी केले आहे सदर कामगारांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मनपा रुग्णालयात उपचार मिळावे या हेतूने आपण मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे असे यावेळी हनुमंत लांडगे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.