मावळ तालुक्यातील विविध विकास कामांविषयी केली सविस्तर चर्चा
शबनम न्यूज | मावळ
मावळ | प्रतिनिधी
शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची आगामी निवडणुकांसंदर्भात व मावळ तालुक्यातील विविध विकास कामांविषयी आज मावळ विधानसभेचे आमदार सुनील (अण्णा ) शेळके यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
तसेच पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीतील उमेदवार संतोष छबुराव भेगडे यांना शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल शिवसेनाप्रमुख,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपर्कप्रमुख सचिन अहिर, माजी मंत्री विजयबापू शिवतरे, खासदार श्रीरंगआप्पा बारणे, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, लोणावळा नगरपरिषद विरोधी पक्षनेत्या शादानभाभी चौधरी व मावळच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, नगरसेवक, नगरसेविकांचे यावेळी आमदार सुनील (अण्णा ) शेळके यांनी आभार व्यक्त केले.
आगामी काळात देखील मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण विश्वासाने हातात हात घालून काम करू,असा विश्वास यावेळी आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.