शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृती करीता प्लॅगोथॉन मोहिम २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत बुधवार, दि. १० नोव्हेंबर २०२१ रोजी चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृह येथे सकाळी १०.३० वाजता आढावा बैठक आयोजित केली आहे.
Advertisement
या बैठकीस क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था, हॉटेल असोसिएशन यांचे प्रतिनिधी तसेच कलाकार, खेळाडू यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाचे उप आयुक्त संदीप खोत यांनी केले आहे.
Advertisement