शबनम न्युज | पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष अश्विनीताई चंद्रकांत तापकीर तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिर रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असून, रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास एक स्मार्ट वॉच किंवा एक हेल्मेट भेट दिले जाईल, अशी माहिती अश्विनीताई तापकीर यांनी दिली आहे.
सदर रक्तदान शिबिर हे साई मल्हार मेडिकल शेजारी, तापकीर चौक, तापकीर नगर, काळेवाडी पुणे-17 येथे आयोजित केलेले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन अश्विनीताई तापकीर यांनी केले आहे.