शबनम न्यूज :- पिंपरी चिंचवड (दि.१८ नोव्हेंबर ) ; पिंपरी युवासेनाच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिम्मित रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन मावळ युवासेना विस्तारक राजेश पळसकर यांच्या हस्ते झाले. या वेळी राजेश पळसकर म्हणाले कि, 80%समाजकारण व 20%राजकारण ही शिकवूणूक आम्हाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. निलेश हाके यांनी केलेले कार्य समाजउपोयगी आहे.
येत्या निवडणूक मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत युवासेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक असतील, असे प्रतिपादन पळसकर यांनी केले.
यावेळेस शिवधर्म फाउंडेशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक अण्णा काटे,युवासेना चिंचवड युवा अधिकारी माउली जगताप, पिंपरी युवासेना सनमक्यक रवी नगरकर, सामाजिक कार्यकर्त्या शिला जाधव,जेष्ठ नागरिक रामभाऊ शिंगोटे,प्राजक्ता ताई कांबळे, महिला विभाग संघटिका कोमल ताई जाधव, किरण ताई पिंपळे, अस्मिता कांबळे, संजय गरुड, रवी कांबळे , प्रभाकर हिंगे,यलप्पा वालदोर, मनोज काची, चिंचप्पा नींडोळ,, अथर्व शिंदे, टॉनी मकासरे,अविराज जाधव,स्वप्निल शेवाळे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.