शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२२ जानेवारी) :- महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भर व्यसनमुक्ती चळवळ सूरू करन्यात येत आहे. या कार्याचा शुभारंभ हा महाराष्ट्र माऊली संत ज्ञानेश्वर, जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि आपल्या परिसरातील ऋषितुल्य थोर संत मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी चिंचवड शहरापासुन सुरू करीत आहोत.
व्यसनमुक्ती चळवळीचा पहीला भाग म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील येऊन ठेपलेल्या मनपा निवडणूकांच्या अनुशंगाने शहरातील भाजपा अध्यक्ष मा. महेश लांडगे (आमदार), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष मा. संजोग वाघेरे, काँग्रेस अध्यक्ष मा. कैलास कदम, शिवसेना अध्यक्ष मा अड सचिन भोसले, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष मा. देवेंद्र तायडे, मनसे अध्यक्ष मा. राजू भालेराव, आर पी आय अध्यक्ष मा. स्वप्नील कांबळे, कष्टकरी पक्ष अध्यक्ष मा. मानवजी कांबळे या राजकिय पक्ष अध्यक्षांना महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघटना अध्यक्ष विल्यम साळवी, सचिव डॅा काशिनाथ बामणे, बी आर मडगुळकर यांनी स्वहस्ते निवेदन देऊन व्यसनमुक्तीची चळवळ सुरू केली आहे.
या निवेदनात आम्ही प्रत्येक राजकिय पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक प्रचारात दारूचा वापर न करण्याबाबत आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारकडून हमी पञ लिहून घेण्यात यावे व कोणी दारूची मागणी केल्यास त्याला स्पष्ट शब्दात नकार देऊन समाजाला व्यसनमुक्तीच्या दिशेकडे घेऊन जान्यास मदत करावी. साधारण अभ्यास व निरीक्षणातून समोर आले आहे की अनेक तरूणांच्या ओठाला पहिला दारूचा प्याला हा निवडणूक प्रचारातच लागतो. आणि त्यामुळे तरूणांच्या जीवनाची दिशा ही व्यसनाधीनतेकडे वळती.असे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. संघटना सदस्य तुषार शिंदे, प्रणिता राठी, आर. बी. पाटील, शमा सय्यद, शिशिर महाबळेश्वरकर आदींचा या व्यसनमुक्ती चळवळीस सहभाग आहे.