शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२२ जानेवारी) :- शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२२ शहरांमध्ये सुरु झाले आहे. या सर्वेक्ष्णाचा प्रमुख हेतू आहे की, व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादा द्वारे साधुन त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे.
याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्षेत्रामधील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करणेत आले.
या अंतर्गत हॉस्पीटल्स, शाळा, हॉटेल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा कचरा वर्गीकरण, पायाभुत सुविधा, स्वच्छता ऍप डाऊनलोड इ. निकषांचे आधारे गुणांक देण्यात आले आहे.
सदर स्वच्छता स्पर्धेमध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील संस्थांनी सहभाग घेतला. स्पर्धेकरता अर्ज व इतर माहिती हॉटेल्स व रुग्णालया करीता वैदयकिय विभाग, शाळाकरिता शिक्षण मंडळ, व गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये याकरिता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये प्राप्त झालेल्या शाळा, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये यांचे अहवालाचे गुणांकनानुसार गुणाक्रमांक काढण्यात आलेला असुन त्याचा निकाल पुढीलप्रमाणे :-
स्वच्छ शाळा :- (माध्यमिक विभाग)
१. द गुड समॅरीटन स्कुल, काळा खडक, वाकड, ( “ड” क्षेत्रिय कार्यालय) – प्रथम क्रमांक
२. पिं.चि.मनपा शाळा क्र. ९२, म्हेत्रेवस्ती, (“फ” क्षेत्रिय कार्यालय) – व्दितीय क्रमांक
३. बाबुराव घोलप कॉलेज, नवी सांगवी, (“ह” क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक
४. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, (“अ” क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ गृहनिर्माण संस्था :-
१. ग्रीन्स सोसायटी, थेरगांव (ग क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक.
२. कल्पतरू इस्टेट फेज – २, जवळकरनगर, पिंपळे गुरव (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
३. सुखवाणी कॅम्पस, वल्लभनगर (ह क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ मंडई :-
१. फुल मार्केट मंडई, पिंपरी – (ह क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
२. कावेरी भाजी मंडई, कावेरी नगर,वाकड – (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
३. अखिल चिंचवड मंडई, चाफेकर चौक, चिंचवड – (ब क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ शासकीय कार्यालय :-
१. तळवडे करसंकलन विभागीय कार्यालय, यमुनानगर – (फ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
२. पोस्ट ऑफिस, पिंपळेगुरव गावठाण – (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
३. वाकड पोलिस स्टेशन, वाकड, थेरगांव – (ग क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ हॉटेल :-
१. किज हॉटेल, सेन्ट्रल मॉल शेजारी मोरवाडी, पिंपरी – (अ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
२. श्री शिवाई हॉटेल, एच ब्लॉक,मोरवाडी – (अ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
३. अभिशिनिया हॉटेल, वाकड – (ड क्षेत्रीय कार्यालय) – व्दितीय क्रमांक
४. अतिथी हॉटेल, थेरगांव – (ग क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक
५. हॉटेल कलासागर, वल्लभनगर – (ह क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ हॉस्पिटल :-
१. नविन आकुर्डी रूग्णालय, आकुर्डी – प्रथम क्रमांक
२. जिजामाता हॉस्पिटल, पिंपरी कॅम्प, पिंपरी – प्रथम क्रमांक
३. नविन थेरगांव रूग्णालय, थेरगांव गावठाण, थेरगांव – प्रथम क्रमांक
४. नविन भोसरी हॉस्पिटल, गुळवे वस्ती, भोसरी – प्रथम क्रमांक
५. ओएनपी लिला हॉस्पिटल, ७२ बीआरटी रोड – प्रथम क्रमांक
६. स्टर्लिंग हॉस्पिटल, प्राधिकरण निगडी – प्रथम क्रमांक
७. विनस हॉस्पिटल, जाधववाडी, चिखली – व्दितीय क्रमांक
८. वेदान्त मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, चिंचवड – तृतीय क्रमांक
सदर विजेत्यांस क्षेत्रीय कार्यालयातर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.