शबनम न्यूज : पुणे (दि.२४ नोव्हेंबर ) :- इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप तर्फे २६ नोहेंबर संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थापक असलम इसाक बागवान यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
दुपारी २पासून सायंकाळी ५ वाजे पर्यंत व्हाँली व्हयू स्कूल, मिठानगर, कोंढवा खुर्द येथे भारतीय संविधानाबद्दल जनजागरण केले जाणार आहे.
संविधान सभा, संविधान जागर, संविधान रक्षण, संविधान शाळा, या उपक्रमाचे आयोजन केले असून त्यात शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरीक यांच्याशी गप्पा गोष्टितून संविधाना ची माहिती दिली जाईल.
या कार्यक्रमात मानव कांबळे, माजी नगरसेवक मारूती भापकर, लक्षमी श्रीकांत, संदिप बर्वे, साधना दधीच, सुनिती सु.र., इब्राहिम खान, डॉ.दिपक बिडकर ,मनिष देशपांडे, संविधान प्रचारक टिम , इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे सर्व पदाधिकारी.
सहभागी होणार आहेत.