शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ नोव्हेंबर ) :-
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर ,युवक शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांचे तडकाफडकी राजीनामे घेतल्या नंतर
त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शहरात राष्ट्रवादी हा बदल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे .
आता शहराध्यक्ष तसेच महिला शहराध्यक्ष व युवक शहराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज दिवसभरात नगरसेवक मयूर कलाटे , नगरसेवक अजित गव्हाणे यांचे शहराध्यक्ष पदाकरिता तर नगरसेविका वैशाली घोडेकर व नगरसेविका अपर्णाताई डोके यांचे महिला शहराध्यक्ष पदाकरिता तसेच युवक शहर अध्यक्ष पदाकरिता निहाल पानसरे यांचे नाव पुढे आले असल्याची चर्चा शहरात आहे
तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे संभ्रमात पडले असून या कार्यकर्त्यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे आज दिवसभर सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मधून नाराजीचा सूर दिसत आहे आगामी येणारी महानगरपालिका जर राष्ट्रवादीला परत ताब्यात घ्यायची असेल तर सध्या असलेले शहराध्यक्ष, महिला शहराध्यक्ष व युवक शहराध्यक्ष पदावरील व्यक्ती बदलू नये अशी एकूण कार्यकर्त्यांची मागणी आहे परंतु एका रात्रीत घेतलेले राजीनामे खूप काही घडामोडी घडणार असल्याचे संकेत देत आहेत आगामी काळात राष्ट्रवादीला महानगरपालिका काबीज करायची असेल तर कार्यकर्त्यांना सांभाळणे ही आवश्यक आहे.
मागील पाच वर्षात भाजप महापालिकेवर एक हाती सत्ता गाजवत आहे परंतु राष्ट्रवादी वतीने म्हणावे तसे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीला देता आले नाही कै. दत्ता काका साने व नगरसेवक नाना काटे यांच्यानंतर सक्षम विरोधी पक्ष नेता राष्ट्रवादीला देता आला नाही तसेच मागील काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीने भाजपाचे भ्रष्टाचार विरोधात आंदोलनास सुरुवात केली होती परंतु ते नंतर कोणत्या कारणाने शांत झाले हे शहरवासीयांना कळले नाही
राष्ट्रवादी हा पिंपरी चिंचवड शहरात मोठा पक्ष आहे मागील पंधरा वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची सत्ता होती मागील वेळी राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले याची सल राष्ट्रवादीच्या नेत्या मध्ये आहे मागील महानगरपालिका निवडणुकीतीळ पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीला मोठा बदल करावयाचा आहे परंतु कार्यकर्त्यांच्या या नाराजीला पण सामोरे जावे लागणार असल्याने आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते पिंपरी-चिंचवड शहरासाठी काय भूमिका घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल