शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ नोव्हेंबर ) :- पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस ओबीसी सेल यांच्या वतीने दापोडी मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अल्ताफ शेख ओबीसी सेल पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व यावेळी सुनील चव्हाण, राजाराम रागपसरे प्रकाश खंडागळे, रमा बाराते, ठकुबाई शेलार ,भारती जाते, रेखा गोवर ,मंदाकिनी राजुरी, नंदा ओव्हाळ ,नाईकनवरे या आरोग्य कर्मचाऱ्यांना संविधान गौरव सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
यावेळी नितीन कांबळे, राजाभाऊ वाळूंजकर, अस्मित कांबळे ,नंदू कांबळे ,अल्ताफ शेख यांच्या शुभहस्ते त्यांना संविधान सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .
यावेळी अल्ताफ शेख बोलताना आज प्रत्येक मानवाला संविधान व संविधान मध्ये काय आहे. त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, तरच या भारताची त्यांना माहिती होईल आज मानव हा जगतअसताना माणसांनी संविधानाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे व संविधान चा अभ्यास केल्यास आपण त्याचा उपयोग होईल असे मनोगत अल्ताफ शेख यांनी व्यक्त केले ह्यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते हुरबानो आपा,शबानाआपा,सालिमभाई सय्यद,लतिफभाई सय्यद उपस्थित होते.