शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ नोव्हेंबर ) :- राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर भोसरी विधानसभेच्या उपाध्यक्षा सारिका युवराज ढमे यांनी “टाटा मोटर्स” कंपनीच्या वतीने नोकरी मेळावा आयोजित केला .
या मेळाव्यात प्रभागातील अनेक मुलामुलींनी खुप छान प्रतिसाद दिला. हा उपक्रम राबविण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे,जागतिक महामारी कोविड काळामध्ये सर्वसामान्य घरातल्या नागरिकांचे रोजगार बंद झाले, नोकऱ्या गेल्या. या बेरोजगार तरुण, तरुणींना एक मदतीचा हात मिळावा, काही अंशी का होईना हाथभार लाउन फूल नहीं फूलची पाकळी अशी संकल्पना मनात धरुन रोजगार मेळावा आयोजित केला.बऱ्याचशा तरुण तरुणींना नोकरीच्या संधीही उपलब्द झाल्या.असे यावेळी सारिका ढमे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या.
सारिका ढमे यांनी या कार्यक्रमा दरम्यान काही दिव्यांग मुलांशीही संवाद साधला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पुणे जिल्हा निरीक्षक कविताताई आल्हाट, महिला शहर अध्यक्षा वैशालीताई काळभोर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष कु.यश दत्ताकाका साने, नगरसेविका संगीतानानी ताम्हाने, महिला शहर कार्याध्यक्ष पुष्पाताई शेळके, स्वीस कंपनीचे चे बालाजी मोरे,शिरीषजी भालेकर,शहर उपाध्यक्षा आशाताई मराठे,शहर संघटिका ज्योतिताई निंबाळकर, पिंपरी विधानसभा सह कार्याध्यक्ष साविताताई धुमाळ, सफाई कामगार महिला अध्यक्षा सुवर्नाताई निकम, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष स्वप्नालीताई असोले, सुप्रियाताई वॉर्ड अध्यक्ष, संगीताताई शहा वॉर्ड अध्यक्ष, सौ.अनीताताई, माधुरीताई, सुनीता ताई, पूनमताई, आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी मेळाव्यात विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले व उपस्थित मान्यवरांनी सारिका ढमे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.