शबनम न्यूज : मुंबई (दि.२६ नोव्हेंबर ) :- मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलिस व अन्य सुरक्षा दलातील वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयात जाऊन मानवंदना दिली तसेच स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
शहीद पोलिसांच्या कुटुंबियांप्रती उपमुख्यमंत्र्यांनी सहसंवेदना व्यक्त केली. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून मुंबई हल्ल्यावेळी शहराचे रक्षण व नागरिकांचे जीव वाचण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
Advertisement