गज़ाला सय्यद
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉन या विषाणूचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ओमायक्रॉन विषाणूचा पुणे शहरात 1 रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान युवा नेते पार्थ पवार यांनी शहरातील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि खबरदारीचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, ओमायक्रॉन विषाणूला हरविण्यासाठी लसीकरण पूर्ण करा, या उत्परिवर्ती विषाणूंविरूद्ध लस हे एकमेव संरक्षण आहे. असे सांगत पार्थ पवार यांनी नागरिकांना ट्विट द्वारे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट द्वारे म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे 6 आणि पुण्यात 1 नवीन रुग्ण आढळून आला आहे. रहिवाशांनी सुरक्षित राहावे आणि खबरदारीचे उपाय करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. घाबरण्याची गरज नाही. लसीकरण करा. या उत्परिवर्ती विषाणूंविरूद्ध लस हे एकमेव संरक्षण आहे.
6 new cases of Omicron have been detected in Pimpri Chinchwad and 1 in Pune. Residents are requested to stay safe and take precautionary measures. No need to panic. Get vaccinated. Vaccines are our only protection against this ever mutating virus. #Omicron
— Parth Pawar (@parthajitpawar) December 6, 2021
Advertisement
शहरात आढळले ओमायक्रॉन विषाणूचे 6 रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरात 6 रुग्णांना ओमायक्रॉन झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. २४ नोव्हेंबर रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने काल रविवारी (दि. 5) रोजी संध्याकाळी दिला आहे.