शबनम न्युज | भोसरी
महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदार संघात आज सकाळी रँलीस सुरवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात आढळरावांचे स्वागत करण्यात आले. रँलीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत होता. महिला व तरुणींनी त्यांचे आत्मयतीने औक्षण केले. युवक-युवतींनी केलेली पुष्पवृष्टि भारावून टाकणारी होती. यावेळी मोठ्या उत्साहात “अबकी बार चारसो पार”, घोषणाबाजी करण्यात आली. श्री साई द्वारकामाई सेवा समिती देवस्थान येथे दर्शन घेत भोसरी येथील नेहरुनगरमधील हाँकी स्टेडियम येथून रँलीस सुरवात करण्यात आली. विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी माजी महापौर वैशालीताई घोडेकर, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, अमित भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेवक गीता ताई मंचरकर, शहर उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, संयोजक विजय फुगे, रवींद्र नांदुरकर, फारुख भाई इनामदार आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले.