शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट सेंटर चे ( थेरगाव बोट क्लब ) ९ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धे साठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून भोपाळ मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ३४ व्य राष्ट्रीय कॅनो स्प्रिंट चॅम्पिअनशिप २०२३ ही स्पर्धा भोपाळ येथे १६-१९ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
निवड झालेल्या खेळाडूंची नावे :
1)अंकुश पावटे 2)कारण आघाव , 3)सुजल परदेशी , 4)राज वाघमोडे , 5)रोहित मरकड ,6)आदित्य चव्हाण , 7)सुयोग वाघ ,8) प्रेम राजोळे , 9)सौरभ नागरे. पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटर गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्यातील खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धे साठी प्रशिक्षण देत आहे. पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स अध्यक्ष मा. सिद्धेश्वर दादा बारणे सचिव दत्तात्रय बारणे. कायाकिंग व कॅनोईंग प्रशिक्षक निखिल बारणे, स्वामी महात्मे, महेश थिटे यांचे मार्गदर्शन लाभले.