शबनम न्यूज | पुणे (दि.१० डिसेंबर) :- महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये ३११० फेरफार नोंदी निर्गत करण्यता आल्या आहेत. यात २४५२ साध्या, ५६३ वारस आणि ९५ तक्रारींचा समावेश आहे.
Advertisement
नोंदी निर्गत करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्याच्या मंडळ मुख्यालयात फेरफार अदालत आयोजित करण्यात आली.
हवेली तालुक्यात ३१९, पुणे शहर १७, शिरुर ३६९, आंबेगाव १६१, जुन्नर ३१०, बारामती ६२६, इंदापूर १७८, मावळ २२४, मुळशी १६७, भोर ११६, वेल्हा ८५, पुरंदर २४५ आणि खेड तालुक्यातील २९३ नोंदी निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती कुळकायदा शाखेचे तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली आहे.
Advertisement