अभिनेत्री ईशा केसकर असणार मुख्य आकर्षण
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील युवानेते दीपक भाऊ भोंडवे यांचा येत्या 14 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने खास नागरिकांसाठी तसेच खास रसिकांसाठी लहान मुलांसाठी व सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी शिव गीत, भीम गीत, कव्वाली, देशभक्तीपर गीत, हा गीतांचा कार्यक्रम विजय पानसरे प्रस्तुत सलाम इंडिया आयोजित करण्यात आला आहे तसेच दीपक भाऊ भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ गल्ली हा एक मनमुराद खवय्यांसाठी विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दीपक भाऊ भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी तसेच लहान मुलांसाठी बाल जत्रा यामध्ये रेल्वे गाडी, टॅटू डेकोरेशन, वॉटर बोट, , बदक गाडी, बलून शूट, जम्पिंग जॅक ,मोटरगाडी, मिकी माऊस ,जादूगर अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे
या कार्यक्रमानिमित्त प्रमुख म्हणजे जय मल्हार या मालिकेची सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर प्रामुख्याने दीपक भाऊ भोंडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या साठी उपस्थित राहणार आहे, तसेच रसिकांशी त्या संवाद हि साधणार आहेत या सर्व उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दीपक भाऊ भोंडवे यांच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत च्या दरम्यान होणार असून मुकाई चौक आदर्श नगर भारत गॅस गोडाऊन शेजारी सदर कार्यक्रम संपन्न होणार आहेअशी माहिती दीपक भाऊ भोंडवे मित्रपरिवार वतीने देण्यात आली आहे.