शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्मा बाबू गेनू यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी विदेशी मालाला भारतात विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी दिलेले बलीदान खूप मोठे आहे. त्यातून देशात सर्वत्र देशभक्तीची बीजे पेरली गेली, अशा घटनांमधून स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना देश स्वतंत्र करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या प्रतिमेस त्यांच्या शहीददिनानिमित उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी पक्षनेते नामदेव ढाके बोलत होते.
यावेळी आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
उपमहापौर नानी घुले म्हणाल्या हुतात्मा बाबू गेनू यांच्या देशभक्तीचा वारसा भावी पिढीने जोपासला पाहिजे. देशभक्त, क्रांतिकारकांचा इतिहास सर्वांनी वाचन केला पाहिजे असे सांगून त्यांनी देशासाठी लढणा-या सर्व क्रांतिकारक, सैनिकांप्रती तसेच देशभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
Advertisement