शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात सरिता साने सखी मंच चे मोठ्या दिमाखात उद्घाटन संपन्न झाले शहरातील निगडी प्राधिकरण परिसरातील रमादेवी वटी सभागृहात शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी हा उदघाटन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात मंचच्या सर्व कार्यकारी मंडळासहित सर्व सदस्य महिला मोठ्या संख्येच्या प्रमाणात उपस्थित होत्या , यावेळी सौ सरिता साने यांनी या सखी मंचच्या नाम फलकाचे अनावरण केले.
सरिता साने सखी मंच वतीने महिलांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत ,यामध्ये प्राधिकरण जत्रा, सौभाग्यवती प्राधिकरण, आरोग्य शिबिरे, पर्यटन अश्या विविध उपक्रमांचा समावेश असेल अशी माहिती यावेळी सौ ज्योती कानेटकर यांनी दिली.
महिलांना स्वतःमधील कलागुण ओळखता यावेत आणि त्यांनी स्वतःसाठी त्याचा उपयोग करावा, उद्योजक महिलांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देणे ,उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन करणे तसेच नृत्य गायन ,अभिनय या कलागुणांना वाव देण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महिलांना एका आगळ्या वेगळ्या सहलीचा अनुभव देणे अशी उद्दिष्टे समोर ठेवून मी या सरिता साने सखी मंच ची स्थापना केली असल्याचे प्रतिपादन संस्थापिका सौ. सरिता साने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
यावेळी सौ पल्लवी पांढरे, तेजस्विनी कदम, शर्मिला बाबर, तेजश्री आडीगे, मीनाताई शिंदे ,सुरेखाताई कटारिया, श्वेता राठोड, शलाका इनामदार ,सौ योगिता काळभोर ,सौ प्रमिलाताई शिनकर ,व सौ.सरिता साने सखी मंचचे सर्व पदाधिकारी अपेक्षा साने, मयुरी सावंत,शेफाली मयेकर, बिना शिरूर ,ज्योती अडगी, संगीता कदम, शारदा जगताप,स्मिता पदमन, कल्याणी देशमुख, मीनल सावंत, पुनम बोराडे मीनल सावंत मयुरी सावंत, सीमा हिंगणे ,प्रीतम शिंदे ,कविता साने ,शोभा साने, भावना पाटील, रश्मी गाडे पाटील ,रोहिणी नवले, शैला निकम ,नंदिनी करे ,सुनिता बंगाळे , मनीषा घाडगे, मनीषा पद्मन, स्मिता साठे,रश्मी भल्ला, व आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सरिता साने सखी मंच च्या उद्घाटन प्रसंगी महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या निमित्ताने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले .या समारंभात महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी महिलांसाठी काही स्पर्धात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला . या स्पर्धा खेळांमध्ये तीन विजेत्या महिलांना अनुक्रमे सोन्याची नथ, चांदीची थाळी आणि एक पैठणी साडी भेट देण्यात आली.
सदर उदघाटन प्रसंगी स्पर्धात्मक खेळात विजेत्या महिलांना बक्षिसे सोनेगरा ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ, अनिता हंबीर यांच्याकडून साडी, स्मिता साठे यांच्याकडून डिझायनर ताट आणि वाट्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाच्या सर्वकार्यकारिणी सरिता साने , ज्योती कानिटकर, कल्याणी देशमुख ,स्मिता पद्मन ,अपेक्षा साने, संगीता कदम, शारदा जगताप ,शेफाली मळेकर, बिना शिरूर ,ज्योती आडगी, मीनल चव्हाण ,अंकिता राऊत, भावना फुलझडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानिटकर यांनी केले.