शबनम न्युज | मुंबई
आज भारतीय संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड याचा २७ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी चाहते त्याला प्रचंड प्रेम आणि शभेच्छा देत आहेत . त्याची पत्नी उत्कर्षा पवार हिने देखील वेगळ्या अंदाजात ऋतुराज ला वाढदिवशी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. उत्कर्षा ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र्र संघाकडून खेळते.
पतीच्या वाढदिवशी तिने तिच्या इन्स्ट्राग्राम हँडलवर लिहिले कि, “मैत्री जी कधीच मरत (तुटणार) नाही… आजही मनाने लहान असलेल्या माझ्या खास व्यक्तीला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
मागील वर्षी ऋतुराज आणि उत्कर्षा विवाहबंधनात अडकले. ३ जून २०२३ रोजी त्यांनी लग्न केले. गायकवाड त्यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग होता, पण त्याने लग्नासाठी संघातून आपले नाव मागे घेतले होते. २४ वर्षीय उत्कर्षा आणि ऋतुराज यांनी प्रेमविवाह केला आहे. लग्नाआधी आयपीएल २०२३ च्या फायनलदरम्यान दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते.