शबनम न्यूज , प्रतिनिधी :
आळंदी : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव येथे शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात 75 वा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला यावेळी संस्थेचे पदाधिकारी विठ्ठल कोंडीबा तळेकर माजी सरपंच यांचे हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांनी ध्वज रोहन करून आळंदीतील विद्यार्थी हे अध्यात्म शिक्षण घेत असून त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती जपण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण गुण असून आपण जीवनात आपले भविष्य उज्वल करण्यासाठी चांगल्या मित्रांसोबत संगत जोडली पाहिजे असे मत व्यक्त करून समाजात अस्तित्व असलेल्या विविध समस्येवर कशी मात केली पाहिजे या संदर्भात विवेचन करून सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षण महर्षी स्व विलासराव तांबे शैक्षणिक संकुलातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत, देशभक्तीपर गीते ,पोवाडा, योगा आणि लेझीम प्रात्यक्षिक सादरीकरण केले
याप्रसंगी ज्ञानेश्वर वरुटे प्रसिद्ध बांधकाम उद्योजक, मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, प्राध्यापक राजीव पाटील, प्रशासकीय संचालक श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ,डॉक्टर प्रमोद इंगळे प्राचार्य ज्ञानविलास फार्मसी कॉलेज, सौ शितल पाटील प्राचार्य आदित्य इंग्लिश स्कूल आणि प्राध्यापक अतुल पानसरे मुख्याध्यापक राजा शिवछत्रपती विद्यालय यांची उपस्थिती होती.
या प्रजासत्ताक दिनाला शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे शैक्षणिक संकुलातील सर्व शाखेतील विभागप्रमुख सहाय्यक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सर्जेराव बरकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉक्टर हंसराज थोरात यांनी मानले अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक माणिक कसाब यांनी दिली