शबनम न्युज / पिंपरी
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमीत्त पिंपरी युवा सेनेच्या वतीने शिवसेनाप्रमूख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रमोद गायकवाड व अविनाश जाधव यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
कोरोना काळात पालकतत्व हरपलेल्या शालेय विद्यार्थांना व आश्रमशाळेतील मुलांना शालेय उपयोगी साहित्य वाटप युवासेनेचे पिंपरी विधानसभा युवा अधिकारी निलेश हाके यांच्या हस्ते करण्यात आले.
Advertisement
यावेळी युवा सेना रविभाऊ नगरकर, युवा सेना उपविधानसभा अधिकारी मा.ओंकार जगदाळे, दिनेश चव्हाण विधानसभा चिटणीस मकरंद कदम,व युवा सेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.