शबनम न्यूज : आंदर मावळ ( दि.२४ मार्च ) :- पिंपरी चिंचवडमधील एचपी गॅस वितरक श्याम काळोखे यांनी आपली कन्या आदिश्री हिचा तिसरा वाढदिवस सहारा वृध्दाश्रमास किराणा व धान्य देऊन साजरा केला.
आंदर मावळमधील कुसवली येथे अनाथ निराधार आजी-आजोबांसाठी असलेल्या सहारा वृध्दाश्रमात येऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक महिन्याचे किराणा सामान येथे सुपूर्द केले.
यावेळी आजी आजोबा यांनी आदिश्रीचे औक्षण करुन तिला शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी पुणे शहर पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक रविंद्र भिडे, चिंचवड गावच्या तलाठी दिपाली बच्छाव-भिडे, मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष लक्ष्मण रानडे आदी उपस्थित होते.
Advertisement