शरद पवार यांचा वाढदिवस तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने पिंपरी-चिंचवड करांसाठी नाट्यमहोत्सव
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१५ डिसेंबर) :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री, शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नगरसेवक भाऊसाहेब भोईर मित्र परिवार वतीने पिंपरी चिंचवड शहरात दिनांक 18 व दिनांक 19 डिसेंबर रोजी दोन दिवसांचा नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच या निमित्ताने या नाट्य परिषदेची आजवर जोडले गेलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात येणार आहे .
या नाट्य महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ‘मोरूची मावशी’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. तसेच रविवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता ‘तू म्हणशील तसं’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होणार आहे. सदर दोन्ही नाटकाचे प्रयोग रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे होणार आहे. अशी माहिती नगरसेवक भाऊसाहेब भोईर मित्र परिवार वतीने देण्यात आली.