शबनम न्यूज : मुंबई (दि.१७ डिसेंबर) :- सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली. महाराष्ट्र काँग्रेसने याबाबत ट्विटवर माहिती दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या निवडी जाहीर केल्या. त्यात प्रणिती शिंदे यांच्याही नावाचा समावेश आहे. या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी गुरुवारी रोजी काढले. आता काँग्रेस आक्रमक पावित्र्यात असून पक्षबळकटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची मुलगी आणि काँग्रेसमधील युवा चेहरा म्हणून प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी घेतलेली भाजपविरोधी भूमिका आणि राज्यातील विषयांची केलेली मांडणी यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.
पटोले यांनी जाहीर केलेल्या प्रवक्त्यांच्या नव्या यादीत भावना जैन, गोपाल तिवारी, निजामुद्दीन राईन, सुधीर ढोणे, चारुलता टोकस, हेमलता पाटील, दिलीप एडतकर, भरत सुरेश सिंह यांचा समावेश आहे. कपिल ढोके, बालाजी गाडे आणि शमीना शेख यांना मीडिया पॅनलिस्ट म्हणून जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्ष प्रवक्ते व मीडिया पॅनलिस्ट पदी नियुक्ती झालेल्या सर्वांचे अभिनंदन! pic.twitter.com/MRYRM6xunM
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 16, 2021
Advertisement