शबनम न्यूज : पुणे (दि.१७ डिसेंबर) :- केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत, तसेच ते रविवारी पुण्यात असणार आहेत तसेच ते पुणे महापालिकेत येणार आहेत. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. पुण्यात ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करणार आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री मा.श्री. रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
गृहमंत्री मा.श्री. अमितभाई शाह रविवारी पुणे महापालिकेत !
देशाचे गृहमंत्री मा.श्री. अमितभाई शाह येत्या रविवारी पुणे दौऱ्यावर असून मा. अमितभाई पुणे महापालिकेत येणार असून त्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 15, 2021
Advertisement