शबनम न्यूज : पुणे (दि.२२डिसेंबर) :- महानगर पालिका प्रभागातील क्षेत्रसभा संपूर्ण महाराष्ट्रात सूरू कराव्यात आणि टाळाटाळ करणाऱ्या दोषी नगरसेवकांवर, आयुक्तांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन इन क्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.सह्याद्री विश्रामगृह येथे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत हे निवेदन मंगळवारी देण्यात आले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत , मुंबईसह अनेक पालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढावा, याकरिता १९९२च्या ७४ व्या घटनादुरूस्ती नुसार क्षेत्र सभा घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका पालिका आयुक्त यांच्यावर क्षेत्रसभा करीता सचिव नियुक्त न करून व क्षेत्रसभा घेण्याची जाणिव करून न दिलेल्या सबबीखाली कर्तव्यात कसूरी या महाराष्ट्र म्युनिसिपल अधिनियम१९४९ ,कलम 36/3 नुसार कारवाई करावी, नगरसेवकांसोबत आयुक्तांवर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही तात्काळ क्षेत्रसभा घेण्यात यावी, या बाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
क्षेत्र सभा न घेतल्याबदल दोषी नगरसेवक अनुक्रमे गफूर अहमद पठाण, परविन फिरोज शेख, हमिदा अनिस सुंडके, साईनाथ संभाजी बाबर प्रभाग क्रमांक 27 पुणे मनपा. तसेच कर्तव्यात कसूरी प्रकरणी आयुक्त यांच्यावर कारवाई करावी.
असलम बागवान हे पुणे पालिका प्रभाग २७ मध्ये राहिवासी असल्याने नागरिक या नात्याने त्यांनी येथील नगरसेवकांच्या अपकृत्यांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी या निवेदनात केली.
अनधिकृत बांधकाम, विज चोरी,पुणे मनपाचा आकाशचिन्ह, पथविभाग, उद्यान विभाग यांचा महसूल बुडविणे, विद्युत विभागाची चोरी, शितल पेट्रोल पंप ते लुल्लानगर पेट्रोल पंप येथील डिव्हायडर मधिल चोरी या करीता नगरसेवक गफूर पठाण यांच्यावर कारवाई करावी, असे बागवान यांनी निवेदनात म्हटले आहे. महानगरपालिका आयुक्त, उप आयुक्त व इतर अधिकारी या सर्व नगरसेवकांना पाठिशी घालीत असल्याची तक्रार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते रेखा घाडगे,पूजा पंडित, पूनम कनोजिया, विश्वंभर मोरे, नंदू पाटील उपस्थित होते.