शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२९ डिसेंबर) ;- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीस पदी निवड झाल्या कारणाने सय्यद यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
सय्यद हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे लोकप्रिय कार्यक्षम नगरसेवक व त्यांचे वर्ग मित्र आदरणीय श्री मयुर शेठ कलाटे यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात काम करण्यास सुरुवात केली.
सय्यद यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. यावेळी सय्यद म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील निवडणुक 2022मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, बाणेर गाव येथे सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उदोजक दत्ता शेठ भोरे, आण्णा हुमनाबादे.पाटील साहेब. डाॅ अतुल फावडे. दत्ता जाधव. शिवराज हुमनाबादे .अप्पा जगदाळे ,ज्ञानेश्वर शेळके. अविनाश वामन. समीर रमजान सय्यद उपस्थित होते .