शबनम न्यूज | मनोरंजन
बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित झाला आहे.
अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत ‘येत्या दिवाळीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
View this post on InstagramAdvertisement
‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता चित्रपटगृहे सुरु होणार असल्यामुळे चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.