शबनम न्यूज प्रतिनिधी पिंपरी चिंचवड
आज दि. २४/०३/२०२३ मा. भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी पवना बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीबाबत सर्व इच्छुक सभासद यांची बैठक झाली. यामध्ये सर्व मतदारसंघातून इच्छुक १४ उमेदवार उपस्थीत होते. दोन दिवसापूर्वी मा. ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच अण्णासाहेब मगर पॅनलची घोषणा करण्यात आली, त्यामुळे वर्षानुवर्ष इच्छुक असलेल्या व वरिष्ठांच्या सांगण्यावरून माघार घेणारे उमेदवार नाराज झाले आहेत. त्यामुळे उरलेल्या इतर उमेदवारांनी मा. भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पॅनल तयार करावा असे ठरविले आहे. त्यानुसार दि.२४/०३/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता मा. भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी सदर बैठक घेण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने बँकेच्या हितासाठी व निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्राथमिक स्वरुपात आम्ही सर्व उमेदवार इच्छुक आहोत. परंतु जर आमच्या पैकी किमान ५ उमेदवार मा. लांडगे साहेबांनी त्यांच्या अण्णासाहेब मगर पॅनलमध्ये घेतले तर उर्वरित सर्व उमेदवार माघार घेतील असे सदरील बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले बैठकीनंतर दोन्ही पॅनलचे नेतृत्व हे सर्व सदस्य एकत्र बसून यावर विचार करतील व त्यानंतर निवडणुकी बद्दल पुढील निर्णय घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. सदरील ठरावास खालील सही करणार हे सर्व सहमत व उपस्थित होते.