शबनम न्यूज वृत्तसंस्था मुंबई
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार या सन्मानाने सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला मुंबई येथील गेट ऑफ इंडिया येथे संपन्न झालेले या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध सचिन तेंडुलकर असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गायन क्षेत्रात आशा भोसले यांनी अनेक दशके रसिकांना आपल्या गायकीने मंत्रमुग्ध केले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गायन कलेसाठी समर्पित केले याकरिता त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Advertisement
सन्मान चिन्ह व 25 लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे सदर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला