शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सामाजिक संस्था शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशन वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्र मध्ये वास्तव्यास असलेले निराधार व्यक्तींना अन्नदान करण्यात आले. शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम संपन्न झाला.
सावली निवारा केंद्र येथे गरीब गरजवंत निराधार व्यक्ती, पुरुष व महिला वास्तव्यास आहेत. या सावली निवारा केंद्रात त्यांचे संगोपन तसेच पुनर्वसन करण्यात येते. या सावली निवारा केंद्रात या निराधार व्यक्तींसाठी राहण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था असून, जेवण, आरोग्याच्या सुविधा अशा अनेक विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येतात. ज्या व्यक्ती समाजाला कंटाळलेली असतात, काही आपले घर सोडून आलेली असतात, तर काहींना घरातून हाकलून दिलेली असतात, ज्यांना कोणताही आधार नसतो, अशा व्यक्तींना सावली निवारा केंद्रात आधार दिला जातो, अशा व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला एक मदतीचा हात या उद्देशाने शमीन हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशन वतीने येथील निराधार व्यक्तींना अन्नदान करण्यात आले.
शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून, या संस्थेअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. या संस्थेने वेलकम स्कूल मारुंजी या नावाने शाळा सुरू केली असून उत्तम प्रकारे शालेय शिक्षणाचे नियोजन या शाळेत केले जाते. याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
सदर कार्यक्रम प्रसंगी शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा शबनम सय्यद यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते अकबर मुल्ला, फाउंडेशनचे संचालक रशीद सय्यद, साहूल उर्फ हमीद शेख, कलिंदर शेख, रेहान हुसेन, फरदीन सय्यद, जाकीर खान आदी मान्यवर उपस्थित होते.
अन्नदान कार्यक्रम वेळी सावली निवारा केंद्रातील निराधार व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद पहावयास मिळत होता. सावली निवारा केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी स्टाफ यावेळी उपस्थित होते. या सर्वांचे आभार यावेळी साहुल उर्फ हमीद शेख यांनी व्यक्त केले.